इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्ती करिता 2 कोटी 20 लक्ष निधी मंजूर
:-सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या प्रमुख मागण्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होत्या त्यांच्या कडून वारंवार मागणी होत असल्याकारणाने इंदापूर तालुक्यामध्ये 2 कोटी 20 लक्ष निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली .राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये रस्ते करणे,ईदगाह मैदान करिता संरक्षक भिंत बांधणे, जारत सभामंडप, शादीखाना बांधणी, कब्रस्तान सुशोभीकरण करणे आदी कामे करण्यात येतात
याप्रमाणे भिगवन येथील भिगवन स्टेशन येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता 15 लक्ष ,भिगवण मज्जित सुशोभीकरण करणे 5 लक्ष ,कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 10 लक्ष,वडापूरी येथे कब्रस्तान दुरुस्ती करणे 30 लक्ष, पिंपरी बुद्रुक येथील जारत सभा मंडप बांधणे 5 लक्ष ,पिंपरी बुद्रुक येथे ईदगाह भिंत बांधणे 5 लक्ष,पिंपरी बुद्रुक येथे ओझरे रस्ता ते कब्रस्तान रोड कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष ,पळसदेव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 15 लक्ष ,शेळगाव येथील कब्रस्तान अंतर्गत रस्ता 10 लक्ष, निमगाव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 10 लक्ष, निमगाव येथे दफनभूमी कडे जाणारा रस्ता 20 लक्ष, सणसर येथे कब्रस्तान संरक्षण भिंत 15 लक्ष ,बेलवाडी येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता 10 लक्ष , लासुरने येथे शादीखाना 20 लक्ष, कुरवली येथे कब्रस्तान ईदगाह मैदान 10 लक्ष ,सराफवाडी येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 15 लक्ष ,वरकुटे येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 15लक्ष आदी कामांना निधी देण्यात आला आहे ..