राज्यात स्वयंपाकाचा गॅस, तसंच वाहनांसाठीचं सीएनजी इंधन स्वस्त
राज्यात सीएनजी आणि पीएनजी सारख्या नैसर्गिक गॅसवरचा व्हॅट अर्थात मुल्यवर्धीत कराचा दर आज पासून १३ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे घरात पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचं सीएनजी इंधन स्वस्त झालं आहे. नवीन दरानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति क्युबीक मिटर असेल असं महानगर गॅस कंपनीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. व्हॅट दर कमी करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती.