June 30, 2025 10:15 am

आमदार आशिष जयस्वालांच्या पुढाकाराने मौदा तालूक्यातील दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार आशिष जयस्वालांच्या पुढाकाराने मौदा तालूक्यातील दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

रजत डेकाटे
नागपूर

मौदा,
रामटेक तालूक्यातील दृष्टीहीन,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मनोविकलांग दिव्यांग व्यक्तींना जीवनाच्या सर्वांगीण समान संधी उपलब्ध व्हाव्यात,दिव्यांगाना शासकीय योजनेत संपूर्ण लाभ मिळावा व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे,या उद्देशाने आमदार आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने शासन स्तरावरुन ग्रामीण रुग्णालय,मौदा येथे दि.३० मार्च रोजी दिव्यांगत्व तपासणी शिबीर घेण्यात आले.शिबिरात तालूक्यातील सर्वप्रवर्गातील एकूण ६४० दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डाॅक्टरामार्फत दिव्यांगत्व तपासणी करण्यात आली.
या शिबिराला शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले,शिवसेना तालूका प्रमुख सदुकर हटवार,प्रशांत भुरे,माजी जि.सभापती नंदा लोहबरे,पं.सं.उपसभापती ज्ञानेश्वर चौरे, सह आमदार आशिष जयस्वाल यांचे स्विय सहायक पुरु मेश्राम, शिबिर समन्वयक अभिजित राऊत,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.पी.यु.पाटील,जिल्हा समन्वयक पांडे,तालूका समन्वयक सुधिर खराबे यांच्यासह भेट दिली.यावेळी मौदा तालूक्यातील येणार्‍या दिव्यांगासाठी अल्पोहाराची व्यवस्था आ.आशिष जयस्वाल यांच्या वतीने तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिवसेना मौदा तालूकाच्या वतीने करण्यात आली होती.
या अत्यंत महत्त्वाच्या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा प्रमुख पंकज पांडे,माजी सभापती मनोज कोठे,नितेश वांगे,कुंडलिक गिरिपुंजे,मौदा न.प. सदस्य शिवराज माथुरकर,वैशाली मेहर,रंजना धनजोडे,रामपाल किरपान,ग्रा.पं. आंजनगाव सरपंच निता पोटफोटे,बंडु सारवे,अरविंद तांबुलकर,वसंता भाजीपाले,ग्रा.पं.नानादेवी सरपंच हरीभाऊ मारबते,संजय सपाटे,युवासेना तालूका प्रमुख अक्षय पंचबुधे,शहर प्रमुख जितु साठवणे
यांचेसह तालुक्यातील सर्व दिव्यांग शाळांचे शिक्षक,कर्मचारी व इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय,नागपूर च्या वैद्यकीय चमूचे सहकार्य लाभले.
मोठ्या प्रमाणावर तपासणी करून त्यांना दिव्यंगांचे तपासणी झाल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!