June 30, 2025 1:59 pm

धनंजय (बापू) वाशिंबेकर यांच्या ७ व्या पुण्यतिथी निम्मित भव्य रक्तदान शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

धनंजय (बापू) वाशिंबेकर यांच्या ७ व्या पुण्यतिथी निम्मित भव्य रक्तदान शिबिर

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

धनंजय (बापू) वाशिंबेकर मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आदरणीय बापूंच्या ७ व्या पुण्यतिथी निमित्त इंदापूर शहरातील अखिल मंडई येथे गुरुवार दि.२४ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच प्रत्येक रक्तदात्यांची नागरी सुरक्षा पॉलिसी (अपघाती विमा) काढण्यात आली.यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूर शहरातील शेख मोहल्ला येथे सुरू असलेल्या मशिदीच्या कामाकरीता ११,१०१ रुपयांचा धनादेश देण्यात आला. 

  या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गारटकर म्हणाले, “वाढत्या अपघाताच्या घटनांमुळे प्रत्येक रक्तदात्याचा अपघाती विमा काढण्याचा आदरणीय धनंजयबापू वाशिंबेकर मेमोरियल फाउंडेशनचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. तर अध्यक्ष अतुल शेटे पाटील म्हणाले, “सन २०१० पासून आम्ही फाउंडेशन च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवित आहोत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,गजानन गवळी,अमर गाडे, अनिकेत वाघ,मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक अतुल शेटे पाटील, प्रशांत उंबरे,सोमनाथ खरवडे,व्यंकटेश वाशिंबेकर,

संदीप वाशिंबेकर,भावेश ओसवाल, इमरान शेख,जावेद मुलानी,राहुल चित्राव,मुनीर शेख, विकी पवार, केदार वाशिंबेकर, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!