विकासच विकास माझा व्हाण तुम्हाला..
विकास चव्हाणची हकालपट्टी करून चौकशी करा !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांची मागणी.. काही लोकांची नावंच अर्थपूर्ण असतात व ते त्याचे सार्थकही करतात. आज आपण बोलणार आहोत, विकास चव्हाण यांच्या बद्धल. विकास म्हणजे प्रगती आणि चव्हाण मधील च वगळला तर उरते ती व्हाण अर्थात चप्पल. याला शासनाने पाठवले उल्हास नगरचा विकास करायला पण हा पठ्ठया एक दोन नव्हे तर तब्बल चार वर्षे ठाण मांडून बसला आहे फेविकोल लावून.कारण याच्या स्व विकासाची विहिर भरतच नाही.इथुन सांगली पर्यंत या विहिरीचा भूयारी मार्ग जातो.हवाल्याचा हवाला देत एकाने दोन कोटी या भूयारी मार्गाने कसे पाहचवले ते सांगतात पण ती एक आख्यायिका समजून आपण दुर्लक्षित केली तरी एक वर्षासाठी आलेली ही प्रतिनियुक्तिवरील मंडळी extention साठी मंत्रालयात लाखोंची बोली लावून का उल्हासनगरमधेच ठाण मांडून बसतात ? हा प्रश्न मला भेडसावत असतो.विकास चव्हाण याची मुदत संपली.शासनाने याला परत बोलवले तरी हे विकास पुरूष उल्हासनगरची गंगा आटेपर्यंत मुक्काम हलवायला तयार नाहीत.मी कालच लिहिलेले वाक्य खुप प्रसिद्ध झाले. दे टक्का तर मारते/मारतो शिक्का ! उल्हासनगर महापालिकेला टक्केवारीचा कॅन्सर झाला आहे.यात लोकप्रतिनिधी, भ्रष्टाचारी अधिकारीच नव्हे तर ठेकेदार हा कॅन्सर पोसत आहेत.कामं न करता बिलं तयार करून कालांतराने ती वठविणे हा तर नित्याचा खेळ झाला आहे.विकास चव्हाण प्रमाणे काही पुरूष व महिला अधिकारी भ्रष्टाचाराची कोटीची उड्डाणे मारीत आहेत.महिन्याला दहा लाख निव्वळ व्याज मिळवणारे अधिकारीही येथे आहेत. उल्हास नगर महापालिकेतील लोकप्रतिनिधींची व स्थायी समितीची मुदत अनुक्रमे ४ एप्रिल व ३१ मार्च २२ ला संपत आहे.त्या आधी महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकून सुफडा साफ अर्थात कंगाल करण्याचा चंग या लोकांनी बांधला आहे.२०० कोटीची खरी खोटी बीलं बनवून ती झटपट मंजूर करण्याची स्पर्धा ठेक्दारांत लागली असून दे टक्का तर मारते/ मारतो शिक्का ! या न्यायाने अधिकारी सही शिक्के उमटवत आहेत. स्वतःला साई,संत म्हणवणारा स्थायी समितीचा सभापती तीन तीन तास सह्या घेण्यासाठी अधिका-यांसाठी ताटकळत उभा राहतो, “३ % जमा करा ३१ मार्चला स्थायी समितीची मुदत संपत आहे त्यापुर्वी ५:२:२ च्या कामांची यादी तयार करा” असा संदेश ठेकेदारांच्या ग्रुपवर वायरल झाला आहे. अतिरिक्त आयुक्तांना ७ लाखांच्या मर्यादेत बीलं मंजूर करण्याचा अधिकार दिल्याने निविदा न काढता एकाच मोठ्या कामाची ७-७ लाखात विभागणी करून ती बीलं सादर करून मंजूर करून घेण्याची अतिरिक्त आयुक्तांच्या दालना बाहेर अक्षरशः झुंबड उडालेली दिसत आहे. काही दबंग नगर सेवक बीलं मंजूर करून घेण्याबाबत दलालाची भूमिका बजावत आहेत, त्यामुळेच आयुक्तांनी लेखा शाखेचे चेक बुकच आपल्या ताब्यात घेतले आहे. विकास चव्हाण सारख्या भ्रष्ट अधिका-यास येथुन त्वरित हटवावे व त्यांच्या सुमारे ४ वर्षाच्या काळातील व्यवहारांची चौकशी करावी,अशी मागणी मी जबाबदारीने करीत आहे. या संदर्भात मत घेण्यासाठी विकास चव्हाण यांना दोन वेळा फोन केला; मेसेजही दिला पण त्यांना प्रतिसाद देण्याची आवशयकता वाटली नाही. विकास चव्हाण यांच्या संदर्भातील बोलकी लक्षवेधी जी नाकारण्यात आली ती सोबत देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी या लूटमारीस आळा घालावा, या पुढे कोणत्याही बिलास मंजूरी देण्याआधी पडाळणी व खात्री केल्याशिवाय कोणतेही देयक मंजूर करू नये ! असा आदेश उल्हासनगर महापालिकेच्या सर्व विभागांना आुक्तांच्या वतीने बजवावा व उल्हास नगर महापालिकेची संभाव्य आर्थिक लूट त्वरित रोखावी,अशी जाहिर विनंती मी करीत आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०