अवैध हातभट्टी व्यवसायावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-10-07 at 5.59.25 PM

अवैध हातभट्टी व्यवसायावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

मुळेगाव तांड्यात ₹५.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर गुन्हे
माढा /प्रतिनिधी अजिनाथ कनिचे
सोलापूर, दि. ७ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई केली. पोलिस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

माढेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर येथे ७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे अवैध हातभट्टी व्यवसायावर छापा टाकला.

WhatsApp Image 2026-10-07 at 5.59.24 PM
WhatsApp Image 2026-10-07 at 5.59.24 PM

या कारवाईदरम्यान अवैध हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, चुली, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळ-मिश्रित रसायन तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य असा एकूण ₹५ लाख ४१ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवैध हातभट्टी निर्मितीचे ठिकाण जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याप्रकरणी चार सराईत हातभट्टी व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही पुढील कारवाई सुरू आहे.

अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. दोषींविरुद्ध हद्दपार व एमपीडीए कायद्यान्वये प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथकातील अधिकारी, अंमलदार तसेच महिला व पुरुष जवानांनी संयुक्तपणे कारवाईत सहभाग घेतला.

WhatsApp Image 2026-10-07 at 6.02.25 PM
WhatsApp Image 2026-10-07 at 6.02.25 PM

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!