हजरत चांदशाह वली उर्सानिमित्त कसाली मोहल्ला गजबजला; भव्य लंगरातून सामाजिक एकोपा अन् बंधुभावाचा आदर्श
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील कसाली मोहल्ला येथे हजरत चांदशाह वली यांच्या उर्सानिमित्त यंदा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या भव्य लंगरचे आयोजन करण्यात आले. या लंगरमध्ये शहरातील विविध भागांतील गरीब, गरजू व निराधार नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रसादाचा लाभ घेतला.
सर्व समाजबांधवांसाठी हा लंगर पूर्णपणे खुला ठेवण्यात आला होता. यावेळी गोड भात, तिखट भात यासह विविध पदार्थ तयार करून उपस्थित नागरिकांना वाटप करण्यात आले. उर्साच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून गरजूंची सेवा करण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेवक नासिर हाजी, नगरसेवक नवीद शेख, माजी नगरसेवक फिरोज पठाण, इमरान शेख कादर, जाकिर पठाण, मोहम्मद साबिर, नईम पठाण, वहाब भाई, जाकिर मिस्त्री, कलीम मिस्त्री, इब्राहिम सर, सादिक भाई, इमरान अली सैय्यद, अफसर पठाण, राजा भाई, अल्ताफ शाह, बजाज शेख, मोहम्मद जाविद, दानिश शेख, रिजवान शेख, आसीफ मेवाती, तोसिफ पहलवान, अमीर भाई, अदनान मनियार, रेहान पठाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.