परमपूज्य महात्मा गांधीजी यांची जयंती व भूतपूर्व स्व. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती या महान विभूतींना अभिवादन करून पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये साजरी
अमळनेर : विक्की जाधव.
वैश्विक स्तरावरील शांती दूध भारत स्वातंत्र्य युद्धाचे प्रणेते परमपूज्य महात्मा गांधी व भारत देशाचे पुरोगामी खंबीर नेतृत्व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती या दोन्ही महान विभूतींना अभिवादन करून साजरी करण्यात आले. सकाळच्या मंगल प्रहरी या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करीत माननीय मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. शाळेच्या पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांनी महात्मा गांधींची यांचे प्रेरणादायी, देशहितकारक व असहकार चळवळीचा मार्ग अवलंबन करीत मिळवलेले स्वातंत्र्य उत्क्रांतीवादी, क्रांतीकारक विचारातून समस्त हिंदुस्थानात एकात्मतेची निर्माण केलेली संघटन शक्ती व त्याद्वारे मिळवलेले स्वातंत्र्य हे विचार समस्त विश्वाला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. अशा अलंकारित वाणीत मनोगत भाव व्यक्त केले. प्रशांत वंजारी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्र कार्यावर प्रकाशझोत टाकीत त्यांच्या देश महासत्ता वादी बनवण्यासाठी घेतलेले कठोर निर्णय व भारतीय किसान व जवानांना दिलेले महत्त्व व त्याच्याकरिता निर्माण केलेले प्रेरणादायी कार्य याचे अमोघ वाणीत मनोगत भाव प्रकट केले.
या कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन डॉक्टर संदेश गुजराथी,मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका एम.एस. बारी, व्ही.पी. बडवे, अशोक महाजन, व्ही.जी. , प्रशांत वंजारी, स्वाती साळुंखे, योगिषा महाजन समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले धन्यवाद.