ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव शांततेत पार पडला; अमळनेर शहर मुस्लिम समाजातर्फे पोलिसांचा सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261002-WA1275

ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव शांततेत पार पडला; अमळनेर शहर मुस्लिम समाजातर्फे पोलिसांचा सत्कार

 

अमळनेर : विक्की जाधव.

ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही उत्सव अमळनेर शहरात शांततेत, सलोख्याच्या वातावरणात आणि उत्साहात पार पडल्याबद्दल अमळनेर शहर मुस्लिम समाज शहर कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक निकम तसेच पोलिस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शहर कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. दोन्ही उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल तसेच नागरिकांनी दाखवलेल्या संयम व सहकार्याबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले.

या वेळी शहर कमिटीचे अध्यक्ष नासिर हाजी, नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेवक नवीद शेख, आरिफ भाया, रज्जाक शेख, रियाज मौलाना, आसिफ भैय्या, राजू शेख, अलाउद्दीन, नईम पठाण, अफसर भाई यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. अमळनेरच्या सामाजिक सलोख्याची आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अधिक मजबूत करणारा हा उपक्रम ठरला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!