July 1, 2025 1:48 am

आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून खर्ड्याच्या ऐतिहासिक लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निंबाळकरांच्या ऐतिहासिक गोष्टींना मिळाला संरक्षित स्मारकाचा दर्जा

अपनी भाषा में पढ़े! Translate

आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून खर्ड्याच्या ऐतिहासिक लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निंबाळकरांच्या ऐतिहासिक गोष्टींना मिळाला संरक्षित स्मारकाचा दर्जा
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
जामखेड | जामखेड तालुक्यातील खर्डा येथील निंबाळकर गढी म्हणजे मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे सरदार निंबाळकर यांच्या निष्ठा व शौर्य याची साक्ष देणारे स्मारक आहे. या स्मारकाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी पुरातत्त्व विभागाकडे निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री व त्यांचे आराध्य दैवत असलेल्या ओंकारेश्वर मंदिर व बारव यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी त्यांना संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याची दखल घेत पुरातत्व विभागाने निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री, ओंकारेश्वर मंदिर व बारव हे संरक्षित स्मारक असल्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत या स्मारकांच्या संवर्धन जतन व विकासासाठी सरकारकडून वेळोवेळी निधी देण्यात येईल व यामुळे सरदार निंबाळकरांच्या व खर्ड्याच्या गौरवशाली इतिहासाला एक नवी झळाळी मिळेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!