July 1, 2025 4:04 am

अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते भजनी मंडळास साहित्याचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते भजनी मंडळास साहित्याचे वाटप

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

 जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील -ठाकरे यांच्या निधीतून डाळज, टणू, बोराटवाडी येथील भजनी मंडळास भजनी साहित्य मंजूर करण्यात आले असून आज इंदापूर येथे अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते भजनी मंडळास साहित्याचे वाटप करण्यात आले.

  डाळज नं.3  येथील प्रगती महिला भजनी मंडळ, टणू येथील भर्तरीनाथ भजनी मंडळ व बोराटवाडी येथील हनुमान भजनी मंडळास भजनी साहित्य उपलब्ध करून दिले आहे यामध्ये पकवाज, वीणा, टाळ, मृदुंग यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भजनाच्या परंपरेला अधिक महत्त्वाचे स्थान असून आनंद द्विगुणीत करण्यासाठी भजनी साहित्य उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली.



निरा भिमा कारखाना  संचालक दत्तू आण्णा सवासे ,कर्मयोगी कारखाना संचालक मानसिंग तात्या जगताप , दयानंद गायकवाड , टणू गावचे सरपंच शितलभैया मोहिते,बलभीम नरहरी मोहिते यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!