June 30, 2025 9:43 am

धुळे जिल्ह्यात येत्या सोमवारपासून शाळा निहाय लसीकरण सुरू

अपनी भाषा में पढ़े! Translate

धुळे जिल्ह्यात येत्या सोमवारपासून शाळा निहाय लसीकरण सुरू

धुळे जिल्ह्यासह शहरातही १२ ते १४ वर्षं वयोगटातील मुलांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलं असून शाळांना सणामुळे सुटी असल्यामुळे या मोहिमेला आतापर्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

परंतु येत्या सोमवारपासून शाळा निहाय लसीकरण देखील सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर प्रसन्ना कुलकर्णी यांनी दिली आहे. या वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू झाल्यापासून जिल्ह्याला २१ हजार कोर्बेव्हॅक्स लसी प्राप्त झाल्या आहेत. तर या वयोगटातील एक लाख ९ हजार ६४५ मुलं या लसीकरणासाठी पात्र आहेत.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून ग्रामीण भागात आशा कार्यकर्ता आणि अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या प्रबोधनामुळे स्वयंस्फूर्तीनं पंधराशे शाळकरी विद्यार्थ्यांचं आतापर्यंत लसीकरण पूर्ण झालं आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!