करमाळ्यात RAMP योजनेच्या माध्यमातून शेतकरी व युवकांसाठी उद्योग विकास कार्यशाळा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-05 at 5.11.36 AM

करमाळ्यात RAMP योजनेच्या माध्यमातून शेतकरी व युवकांसाठी उद्योग विकास कार्यशाळा संपन्न
करमाळा (प्रतिनिधी) : RAMP (Raising and Accelerating MSME Performance) योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी व युवकांना उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी करमाळा तालुक्यातील जेऊर व शेलगाव येथे विशेष उद्योग विकास कार्यशाळा पार पडली. शिवसेना जिल्हाप्रमुख (ओबीसी) सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे यांच्या पुढाकारातून आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वामनदादा बदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यशाळेत मुख्य उद्दिष्टे व मार्गदर्शन करताना सांगितले की
अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन व शेतीपूरक उद्योग उभारून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यावर भर देणे गरजेचे आहे तसेच करमाळा तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांमध्ये RAMP अंतर्गत व्यवसाय, पशुपालन व अनुदानाची माहिती घरपोहोच पोहोचवण्याचे ध्येय ठेवण्यात आले असल्याचेही कर्चे यांनी यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून युवकांनी उद्योजकतेकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास माजी युवासेना तालुका उपाध्यक्ष शहाजी बोराडे, ओबीसी तालुका उपाध्यक्ष प्रदीप मेटे, युवासेना तालुका उपाध्यक्ष ज्योतीराम काळे, रामकृष्ण टेलर, एसबीआय लाईफ डीएम (करमाळा शाखा) माधव सूर्यवंशी, जेऊरवाडीचे सरपंच अण्णासाहेब पाटील, उद्योजक संतोष बदे (उमरड), बापू मोरे, राहुल कर्चे, नितीन निमगिरे, संकेत मटेकर, दादासाहेब निमगिरे, पोफळजचे सरपंच बिभीषण गव्हाणे, प्रशांत गोडसे, हनुमंत काळेल, महेश पोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यशाळेत उपस्थितांना शासकीय योजना, अनुदान, उद्योग उभारणी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीपूरक व्यवसाय करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक पातळीवर या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शेतकरी व युवकांकडून स्वागत करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!