महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा; प्रियांका गायकवाड यांच्या पुढाकाराला दिग्विजय बागल व पंचायत समिती सभापती पूजा ढेरे यांचा सकारात्मक प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-04 at 7.47.51 PM

महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा; प्रियांका गायकवाड यांच्या पुढाकाराला दिग्विजय बागल व पंचायत समिती सभापती पूजा ढेरे यांचा सकारात्मक प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी :- पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय असेल, तर सर्वसामान्यांच्या समस्या निश्चितच जलद गतीने मार्गी लागतात, असे प्रतिपादन युवा नेते दिग्विजय बागल यांनी केले.

शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी महिलांच्या विविध प्रश्नांना व विकासाच्या संधींना केंद्रस्थानी ठेवत पुढाकार घेतला आहे. महिलांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, बचत गट, महिला सक्षमीकरण व सबलीकरण याबाबत ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

यासाठी प्रियांका गायकवाड यांनी युवा नेते दिग्विजय बागल तसेच पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रियांका गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी बोलताना युवा नेते दिग्विजय बागल म्हणाले की, माझे वडील माजी मंत्री व लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या कार्यशैलीतून मला नेहमीच जनतेच्या प्रश्नांकडे तत्परतेने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्याच कार्यपद्धतीने जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे.

महिलांच्या उन्नती, प्रगती आणि सन्मानासाठी प्रियांका गायकवाड यांनी मांडलेली ही संकल्पना अत्यंत सकारात्मक असून, त्याला आपण तात्काळ होकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असेही दिग्विजय बागल यांनी स्पष्ट केले.

पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांसाठी निश्चितपणे जनजागृतीपर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले .
महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या प्रियांका गायकवाड यांच्या या प्रयत्नाचे महिला वर्गातून स्वागत होत असून, त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम महिलांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!