भक्तिमय वातावरणात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा; भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
अमळनेर : विक्की जाधव.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मुंदडा एक्झोटीका अपार्टमेंट, भालेराव नगर, धुळे रोड, अमळनेर येथे आज शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी व भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात भजन, भक्तिगीते आणि धार्मिक वातावरणाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. श्रीकृष्ण भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
श्रीमती मिराबाई मधुकर पाटील, श्री. लोटन मधुकर पाटील, सौ. प्रतिभा लोटन पाटील, श्री. सौरभ लोटन पाटील, सौ. दिप्ती सौरभ पाटील व चि. रूद्रांश सौरभ पाटील यांनी भाविकांना कार्यक्रमाचे मनःपूर्वक निमंत्रण दिले आहे. “आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी आनंदाची पर्वणी!” या भावनेतून सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.