अमळनेरात गोमातेची पूजा-अर्चना; गोसेवेतून साजरी होणार जन्माष्टमी! गोसेवक गोविंद अग्रवाल यांच्या संकल्प 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260904-WA0695

अमळनेरात गोमातेची पूजा-अर्चना; गोसेवेतून साजरी होणार जन्माष्टमी! गोसेवक गोविंद अग्रवाल यांच्या संकल्प

 

अमळनेर : विक्की जाधव.

श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेरात गोसेवेला धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा, पळासदडे रोड, अमळनेर येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोमाता पूजा-अर्चना तसेच गोसेवेचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Screenshot_2026-09-04-09-34-10-50_7352322957d4404136654ef4adb64504

श्री छत्रपती शिवाजी महाराज गाईड ग्रुप, अमळनेर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात गोमातेची विधिवत पूजा-अर्चना करून त्यानंतर गोमातेला भोजन देण्यात येणार आहे. गोसेवक गोविंद अग्रवाल यांच्या विनंतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून श्रीकृष्णाच्या गोप्रेमाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आज ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद आहे. यावेळी सर्व सदस्यांनी सपरिवार उपस्थित राहून गोसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव भक्तीबरोबरच गोसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा अनोखा उपक्रम अमळनेरात पाहायला मिळणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!