करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) : दतपेठ तरुण मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी रितेश कटारिया यांची, तर उपाध्यक्षपदी सुंदर महामुनी व धनराज महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी भणगे, खजिनदारपदी नितेश देवी, हर्षा घोडेगावकर व अजिंक्य महाजन यांची निवड झाली आहे. तसेच गणेशोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मिरवणूक प्रमुख म्हणून मनोज भणगे व शिवम तांगडे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यावर्षीच्या श्रीगणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी दतपेठ तरुण मंडळाच्या वतीने अतिशय भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच या गणेशोत्सवात भाविकांसाठी आकर्षक व प्रबोधनात्मक असा ‘सजीव देखावा’ सादर केला जाणार असल्याचे मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
या नूतन कार्यकारिणी निवड सभेप्रसंगी नगरसेवक विक्रम परदेशी, अमोल परदेशी, अभय महाजन, संग्राम देशमुख, अरुण टांगडे, विश्वजीत परदेशी, प्रदीप देवी, संकेत खाटेर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन केले जात आहे.