अमळनेरात लोककलेचा जागर; ८५ बालकलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260905-WA0401

अमळनेरात लोककलेचा जागर; ८५ बालकलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : विक्की जाधव.

मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा व मराठी वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमळनेरातील विविध शाळांमधील तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोककलेचा समृद्ध वारसा जाणून घेतला. लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, बालकलाकारांना विविध लोककलांची ओळख करून देणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी वाङ्मय मंडळाचे सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. संचालक संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी शाहीर विनोद ढगे, शाहीर नाना पाटील, सचिन महाजन, मोहित पाटील, हर्षल पवार व अवधूत दलाल यांचा मंडळाचे संचालक बन्सीलाल भागवत व सौ. वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बापूराव पाटील (ठाकरे सर), प्रशांत कापडणे सर व सौ. शीला पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांच्या प्रेरणेतून व संचालक मंडळाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला अमळनेरातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन कार्यवाह भैय्यासाहेब मगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल हेमंत बाळापुरे व जगदीश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. लोककला, संस्कृती आणि बालप्रतिभेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे अमळनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक व प्रेरणादायी पाऊल पडले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!