गोगा नवमीनिमित्त श्रद्धेचा जागर; अमळनेर शहरात शहरात भक्तिमय वातावरण
अमळनेर : विक्की जाधव.
गोगा नवमी निमित्त शहरासह परिसरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे. गोगादेवाच्या पूजनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा, नैवेद्य व दर्शन घेत भाविकांनी गोगादेवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
गोगा नवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महिला, पुरुष, बालकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोगादेवाचे दर्शन घेतले. काही ठिकाणी भजन, धार्मिक कार्यक्रम तसेच प्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने दिवसभर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारा हा सण नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गोगा नवमीच्या निमित्ताने नागरिकांनी सुख-समृद्धी, आरोग्य व कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. त्यामुळे शहरातील विविध भागांत ‘गोगादेव महाराज की जय’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.