निंबोडीत “TB मुक्त भारत” अभियान अंतर्गत 72 नागरिकांची मोफत छातीची तपासणी
सरपंचांनी स्वतः करून दाखवली तपासणी, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
—(निलेश गायकवाड)
निंबोडी, ता. बारामती, जि. पुणे:
दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या “आपले गाव, आरोग्य संपन्न गाव” या मोहिमेअंतर्गत निंबोडी आरोग्य उपकेंद्रात “TB मुक्त भारत अभियान” मोठ्या उत्साहात पार पडले.
या अभियानासाठी विशेष X-RAY व्हॅन निंबोडी येथे दाखल झाली होती. या मोहिमेअंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसह एकूण 72 नागरिकांची मोफत छातीची तपासणी करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन निंबोडीचे विद्यमान सरपंच मा. श्री संतोष मोहन सोनवणे आणि माजी उपसरपंच नामदेव रघुनाथ बाड यांच्या हस्ते झाले.
या वेळी बारामती पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे सर आणि TB सुपरवायझर श्री मोहिते साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
सरपंचांचे आवाहन
सरपंच संतोष सोनवणे यांनी स्वतः छातीची तपासणी करून घेतली. त्यांचा TB रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, “सर्वांनी छातीचे X-RAY करून घ्यावेत. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महिलांनी विशेषतः सकस आहार घेऊन तब्येतीकडे लक्ष द्यावे.”
आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य
या X-RAY व्हॅनमध्ये लॅब टेक्निशियन श्री नीरज आडे आणि त्यांचे सहकारी श्री सुरज जाधव, श्री रोहित जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
याप्रसंगी आरोग्य निरीक्षक विजय मदने साहेब, आरोग्य उपकेंद्र निंबोडीच्या आरोग्य सेविका सौ. संगीता चव्हाण, आरोग्य सेवक श्री विकास कापसे, आशा सेविका सौ. रूपाली धुमाळ, सौ. ललिता सूर्यवंशी तसेच ग्रामस्थ नारायण विधाते, बाबुराव धुमाळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“TB मुक्त भारत” हे केंद्र सरकारचे ध्येय लवकरात लवकर साध्य करण्यासाठी अशा तपासणी मोहिमा गावागावात राबविण्यात येणार आहेत.