डान्स दिल से डान्स अकॅडमीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-18 at 10.41.00 AM

डान्स दिल से डान्स अकॅडमीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

डान्स दिल से डान्स अकॅडमी (माळेगाव/बारामती), शाखा क्रमांक २ बारामतीचा पाचवा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे लाडके कलाकार व मराठी वेबसिरीजमधून प्रसिद्ध झालेले तसेच ‘चांडाळ चौकडीच्या करामती’चे निर्माते मा. श्री. सुभाषराव मदने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव उपस्थित होते.

या सोहळ्यास अकॅडमीचे सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी तसेच नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डान्स दिल से डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचा विशेष गौरव करण्यात आला.

WhatsApp Image 2026-08-18 at 10.41.00 AM (1)

अकॅडमीच्या लहान गटातील विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या नॅशनल लेव्हल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुढील व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी उज्जैन-महाकाल येथे झालेल्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत पुढील अंदमान आयलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळविली आहे.

या यशाबद्दल अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा बक्षीस वितरण करून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, पालकांच्या सहकार्याचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे उत्कृष्ट प्रशिक्षण देत त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी डान्स दिल से डान्स अकॅडमी सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी डान्स दिल से डान्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व कोरिओग्राफर योगेश लोणकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!