“भिगवणमध्ये मच्छीमारांचा कडकडीत बंद; 70 लाखांची उलाढाल ठप्प”
“मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा”
—(निलेश गायकवाड )
भिगवण, दि. 11 ऑगस्ट 2026 : प्रतिनिधी
भिगवण येथील मच्छीमारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी कडकडीत बंद पुकारला. त्यामुळे उजनी जलाशयालगतचा भिगवण मच्छी बाजार दिवसभर पूर्णपणे बंद राहिला.
दरोज सुमारे 70 लाख रुपयांची उलाढाल होणारा हा बाजार बंद असल्याने मच्छीमार, व्यापारी, हमाल, हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. लांबून मासे खरेदीसाठी आलेले मच्छी खवय्येही रिकाम्या हाती परतले.
मच्छीमारांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
1. उजनी धरणातील पाणी प्रदूषण रोखणे – दूषित पाण्यामुळे माशांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.
2. बेकायदेशीर मासेमारीवर कठोर कारवाई – अवैध जाळे आणि विषारी औषधे वापरून मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घालावी.
3. मच्छीमारांना परवाने आणि सुविधा – मच्छीमारांना कायदेशीर परवाने, विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने द्यावा.
4. बाजाराची स्वच्छता आणि पायाभूत सुविधा – भिगवण मच्छी मार्केटमध्ये स्वच्छता, पाणी आणि वीजेची व्यवस्था सुधारावी.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार मच्छीमार संघटनांनी व्यक्त केला. जोपर्यंत प्रशासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत बंद सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.