न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

ठेकेदाराच्या निष्काळजी कामाने हिरावला पोलिस कर्मचाऱ्याचा जीव.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260811-WA0811

ठेकेदार निष्काळजी कामाने हिरावला पोलिस कर्मचाऱ्याचा जीव?..

 

मारवड पोलिस ठाण्यातील भरत गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू; ठेकेदार उमेश शहा सह जबाबदारांवर कारवाईची मागणी

 

अमळनेर : विक्की जाधव.

पिंपळे रोड व ८० फुटी डीपी रस्त्याच्या क्रॉसिंगदरम्यान सुरू असलेल्या मात्र अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मारवड पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी भरत गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गायकवाड हे ८० फुटी मार्गाने धुळे रोडकडून मोटारसायकलने येत असताना पिंपळे रस्त्याच्या क्रॉसिंगजवळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने मोटारसायकलसह नाल्यात कोसळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

या घटनेने शहरातील अपूर्ण व असुरक्षित रस्त्यांच्या कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बॅरिकेडिंग, सूचना फलक अथवा सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था होती का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. गायकवाड यांच्या मृत्यूचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार असले तरी, अपूर्ण रस्त्यामुळे अपघातास कारणीभूत परिस्थिती निर्माण झाली का, याचा तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

एक निष्पाप जीव गेला, आता तरी प्रशासन जागे होणार का?

या घटनेची सखोल चौकशी करून रस्त्याचे काम करणारे ठेकेदार उमेश शहा तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

विकासकामे नागरिकांच्या सोयीसाठी असतात; मात्र तीच कामे सुरक्षा उपायांशिवाय केली गेली तर ती जीवघेणी ठरू शकतात, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!