पारोळा तालुक्यात करणी सेनेला नवे नेतृत्व; रुपेशकुमार राजपूत यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती!
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी बोदर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेशकुमार पांडुरंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पारोळा तालुक्यात संघटनेच्या कार्याला नवी दिशा व अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नियुक्तीनंतर रुपेश राजपूत यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासोबतच संघटनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल रुपेश राजपूत यांनी संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेवसिंहजी दादा गोगामेडी, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. शीला ताई सुखदेवसिंहजी गोगामेडी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविणसिंगजी दादा राजपूत, कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब राजपूत, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, प्रदेश संघटक विलास राजपूत, महिला प्रदेशाध्यक्षा शुभांगी ताई राजपूत, जळगाव जिल्हाध्यक्ष संदीप सिंह राणा यांच्यासह राज्य व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या नियुक्तीबद्दल बोदर्डे तसेच पारोळा तालुक्यातील समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य तालुक्यात अधिक व्यापक व प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.