“१२ वर्षांत सर्वांचे बारा वाजले!” “इतकी वर्षे सत्तेतहोतात नां” मग केले काय? मशाल मोर्चातून खा. स्मिता वाघ अनिल पा. यांच्यावर अशोक पवारांचा घणाघात

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260811-WA0739

“१२ वर्षांत सर्वांचे बारा वाजले!” “इतकी वर्षे सत्तेतहोतात नां” मग केले काय? मशाल मोर्चातून खा. स्मिता वाघ अनिल पा. यांच्यावर अशोक पवारांचा घणाघात

 

अमळनेर : विक्की जाधव.

९ ऑगस्ट क्रांतीदिनी अमळनेरात मशाल मोर्चाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. “१२ वर्षांत सर्वांचे बारा वाजले” असा घणाघाती नारा देत मोर्चेकऱ्यांनी प्रशासन आणि शासनाला धारेवर धरले. विविध सामाजिक, राजकीय व विद्यार्थी संघटनांच्या सहभागाने निघालेल्या या मशाल मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर तीव्र टीका करत जनतेने आता गप्प न बसता आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याची वेळ आली असल्याचा सूर उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केला.

मोर्चाला संबोधित करताना अशोक पवार यांनी खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांच्यावर घणाघाती प्रहार केला. “इतकी वर्षे तुम्ही सत्तेत आहात, मग जनतेसाठी काय केले?” असा प्रश्न करत त्यांनी डांगर गावाला अद्याप पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिले आहेत; त्यामुळे आपल्या हक्कांसाठी जाब विचारला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. पडळसरे धरणाच्या वाढलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत १४५ कोटींच्या धरणाचा खर्च हजारो कोटींपर्यंत पोहोचतोच कसा, असा सवाल करत यासाठी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले.

प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील यांनी क्रांती दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देत क्रांतिसिंह नाना पाटील, लीलाताई पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. “ही साने गुरुजींची पावन भूमी आहे; ही भूमी बिकानेर म्हणून ओळखली जाऊ नये,” अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी जनतेला जागे होण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात काहीच नसताना संघर्षातून स्वातंत्र्य मिळवले, आज संसद, सत्ता आणि व्यवस्था असूनही सामान्य जनतेचे प्रश्न कायम आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पेपरफुटीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला लक्ष्य करत “दिल्लीत काठी चालली तर त्याचे दुःख अमळनेरात होते,” असे सांगत “लोकांनो, हो जागे व्हा!” असा एल्गार केला. यावेळी महाविकास आघाडी, नॅशनल युथ काँग्रेस, मराठा सेवा संघ, एनएसयूआय, विद्यार्थी सेना, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, पुरोगामी क्रांती दल, प्रहार संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!