किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त दणदणित पतंग महोत्सव संपन्न; संस्कृती आणि उत्साहाचा अनोखा संगम!

अपनी भाषा में पढ़े! Translate

59721541-15d0-4651-b7f9-91a2b88dfab8

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरात नागपंचमीच्या सणाला ऐतिहासिक आणि मोठी परंपरा लाभली असून, या दिवशी शहरात मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा केला जातो. या पारंपरिक वारशाला कायम ठेवित, यंदाही किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळच्या वतीने नागपंचमीच्या निमित्ताने एका भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
लोकमान्य टिळक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष सौरभ उर्फ माऊली कदम यांच्या विशेष पुढाकाराने हा पतंग महोत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि दणदणीत वातावरणात पार पडला. आजच्या काळात सण-उत्सव साजरे करताना सार्वजनिक शिस्तीचे पालन कसे करावे, याचे उत्तम उदाहरण या तरुण मंडळाने घालून दिले आहे.
विशेष म्हणजे, महोत्सवादरम्यान युवकांनी आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करत साउंड सिस्टीमवर नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रसन्न आणि चांगल्या दर्जाच्या गाण्यांवर ठेका धरला. किल्ल्यातील नागरिकांची कोणतीही गैरसोय किंवा विनाकारण कोणालाही त्रास न होऊ देता, पारंपरिक उत्साहात नृत्य करत आणि पतंग उडवत तरुणांनी नागपंचमीचा सण एका कौतुकास्पद पद्धतीने साजरा केला.
या पतंग महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उत्सवात सहभागासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये मंडळाचे माजी अध्यक्ष विशाल गायकवाड, अभिजीत सुरवसे, सागर गायकवाड, दिपक सुरवसे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी विरेंद्र लष्कर, गणेश शिंदे, अभिजीत कारंडे, विनायक तोडकर, कमलेश तोडकर, शिवराज तोडकर, साहिल पठाण, गौरव ननवरे, कुणाल ढाणे, आकाश सुरवसे, श्री पिंपळे, सर्वेश जाधव, रुद्र ननवरे, पप्पू मुसळे, अनिकेत रोकडे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
करमाळा शहराच्या संस्कृतीला आणि परंपरेला जपत, कोणतीही अशोभनीय कृती न करता अत्यंत शिस्तप्रिय आणि आनंददायी वातावरणात पतंग महोत्सव साजरा केल्याबद्दल लोकमान्य टिळक तरुण मंडळ आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!