महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; ३०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260810-WA0472

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; ३०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

 

अमळनेर : विक्की जाधव.

परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार पाल्य तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काल झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणभाऊ सपकाळे यांनी प्रज्ञावंत फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रज्ञावंत फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी तब्बल ३०० विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

“केवळ आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अपूर्ण राहता कामा नये,” . गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, शिक्षणाच्या माध्यमातूनच सक्षम आणि सुशिक्षित समाजाची निर्मिती होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!