न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

“भिगवण-राशीन उड्डाणपुलाच्या सर्विस रोडवर काटेरी झुडपांचा विळखा, शेतकरी आणि नागरिक त्रस्त”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-11 at 8.43.55 AM

“भिगवण-राशीन उड्डाणपुलाच्या सर्विस रोडवर काटेरी झुडपांचा विळखा, शेतकरी आणि नागरिक त्रस्त”
“निकृष्ट कामामुळे जीवाला धोका; प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त”

(निलेश गायकवाड)

दौंड, दि. 9 ऑगस्ट 2026

भिगवण-राशीन रोड वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या सर्विस रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्विस रस्त्याला काटेरी झुडपांनी अक्षरशः विळखा घातला असून त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे शेतकरी आणि नागरिकांसाठी जिकरीचे झाले आहे.

सर्विस रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे आणि शेतात जाणे-येणे मोठे कठीण झाले आहे. रस्त्यावरच झाडे-झुडपे वाढल्याने कोणतेही चारचाकी वा दुचाकी वाहन नेणे शक्य होत नाही.

या गंभीर समस्येकडे भिगवण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

उड्डाणपुलावर जीवाला धोका
आज उड्डाणपुलावरील लोखंडी सळई आणि अँगल रस्त्याच्या वर आले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. फूटपाथवर गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

नागरिकांचा आरोप
भिगवण-राशीन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पुलावर पथदिवे बसवलेले नाहीत. सर्विस रोडचे डांबरीकरण करून त्यावर सिलकोट न करता बिल अदा करण्यात आले आहे. सतत सळ्या आणि चॅनल तुटून खड्डे पडत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.

मा. अशोकराव गायकवाड, माजी सरपंच, खानवटे ता. दौंड म्हणाले, “ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा लवकरच ग्रामस्थ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहेत.”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!