जनतेच्या सेवेची हीच वेळ संकटाच्या काळात जनतेसाठी धावल्या अपूर्वा ताई; प्रभाग ८ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260809-WA0946

जनतेच्या सेवेची हीच वेळ संकटाच्या काळात जनतेसाठी धावल्या अपूर्वा ताई; प्रभाग ८ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, त्याचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेलाही बसला आहे. बोरी नदीतील मुख्य पाईपलाईन तुटल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सौ. अपूर्वा जालंधर चौधरी आणि जालूभाऊ चौधरी यांनी पुढाकार घेत प्रभाग क्रमांक ८ व परिसरातील नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे.

IMG-20260809-WA1003

संकट कितीही मोठे असो, जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उभे राहण्याची भूमिका अपूर्वा ताई चौधरी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली. पावसामुळे निर्माण झालेली आपत्ती, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि नागरिकांची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांमध्ये राहून मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांच्या या तत्परतेचे आणि सेवाभावी भूमिकेचे कौतुक होत आहे.

राजकारणापेक्षा जनसेवा महत्त्वाची, हीच भूमिका कृतीतून दाखवणाऱ्या अपूर्वा ताईंच्या प्रयत्नांना परिसरातून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ लागणार असताना, तोपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम दिलासा देणारा ठरत आहे. संकटाच्या काळात जनतेसोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या अपूर्वा ताई आणि जालूभाऊ चौधरी यांच्या या कार्याची प्रभागात चर्चा रंगली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!