रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260809-WA1015

रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 

अमळनेर : विक्की जाधव.

पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी तथा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र सखाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण रमेश महाजन यांनी रवींद्र मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

पत्रकारांच्या हितासाठी तसेच संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोरे यांनी संघटनेची उद्दिष्टे, नियम व धोरणांचे पालन करून प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यात पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असलेल्या रवींद्र मोरे यांच्या नियुक्तीचे पत्रकारिता क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, रवींद्र मोरे यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!