प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी सुरेश कांबळे

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260809-WA1019

प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी सुरेश कांबळे

 

अमळनेर : विक्की जाधव.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी पत्रकार सुरेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासह सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविणे आणि पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात असून सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रिंट मीडिया विभाग अधिक सक्षम करण्यासोबतच पत्रकारांच्या विविध समस्या संबंधित पातळीवर प्रभावीपणे मांडण्यावर भर दिला जाणार आहे. प्रिंट मीडिया विभागाची तालुका कार्यकारिणी तसेच संघटनेच्या इतर विभागांच्या तालुकाध्यक्ष व कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कांबळे यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!