विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शिरपूर वीर एकलव्य यांना अभिवादन
जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिरपुर शहरातील खंडेराव मंदिर चौक येथे दि. 9 ऑगस्ट रोजी वीर एकलव्य महाराज यांच्या स्मारकास माल्या-अर्पण करत अभिवादन करण्यात आले..
यावेळी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, हिंगोणी सरपंच सोमा भिल, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, शिरपुर भाजपा मा. शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर मा. चिटणीस राधेश्याम भोई सह आदी उपस्थिती होते.
पाणी, जंगल आणि जमिनीचे शतकानुशतके रक्षण करणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जल, जंगल आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या आदिवासी समाजाने आपली अनोखी संस्कृती नेहमी जपून ठेवली आहे. निसर्गाचा आदर करत जगण्याची त्यांची जीवनशैली आज संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे. आदिवासी बांधवांच्या लोककला, भाषा आणि परंपरेने आपल्या देशाचा वारसा अधिक समृद्ध केला आहे. त्यांचे हे प्रेम आणि निसर्गाशी असलेले नाते आपल्या सर्वांना निसर्गावर प्रेम करण्याची शिकवण देते.i