“भिगवणमध्ये बंदी असूनही गुटखा विक्री सर्रास सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-09 at 8.48.28 AM

“भिगवणमध्ये बंदी असूनही गुटखा विक्री सर्रास सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष”
“पोलीस बंदोबस्त असूनही भिगवणमध्ये खुलेआम गुटखा विक्री”

(निलेश गायकवाड)

इंदापूर, दि. 9 ऑगस्ट 2026 : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शासनाने बंदी घातलेली असतानाही गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे. शाळा-कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणांजवळही हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असूनही भिगवण बाजारपेठ, बसस्टँड परिसर आणि गावातील किरकोळ दुकानांमध्ये हे पदार्थ पडद्याआडून विकले जात आहेत. काही ठिकाणी तर खुलेआम विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तरुणाईचे आरोग्य धोक्यात
सहज उपलब्धतेमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही याच्या आहारी जात आहेत. रस्त्यावर, नाल्यांवर पडलेले गुटख्याचे पुडे आणि थुंकीमुळे गावाची स्वच्छताही बिघडली आहे. यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे.

प्रशासन कारवाई करणार कधी?
बंदी असूनही कारवाई होत नसल्याने “प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने धाडी टाकून या अवैध विक्रीवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

“फक्त नावाला बंदी आहे. प्रत्यक्षात गावाच्या कानाकोपऱ्यात गुटखा मिळतो. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे” असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन भिगवणमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!