कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ….
आज दि .01/08/2026 रोजी विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून क्रांती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या वकृत्वातून दोन्ही महान व्यक्तींच्या कार्यांना उजाळा दिला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती जे. बी. नेरकर ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.जे.मोरे यांनी केले. तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आर . डी.राजपूत सर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री सी. व्ही. पाटील सर शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.