गुन्हेगाराला खाकीचा दणका! गांधीपुरात धाडसी कारवाईची शहरभर चर्चा

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260725-WA0602

गुन्हेगाराला खाकीचा दणका! गांधीपुरात धाडसी कारवाईची शहरभर चर्चा

 

अमळनेर : विक्की जाधव.

गांधीपुरा परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) याच्यावर अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्वतः पोलीस पथकासह त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेत थेट गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणले. या कारवाईची शहरभर चर्चा रंगली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राजेश निकुंभ याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह (कलम ३०७) अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. मात्र, जामिनावर असतानाही परिसरात चाकूचा धाक दाखवणे, नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे आणि लूटमारीसारख्या प्रकारांमुळे त्याच्याविरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता त्याच्या घरावर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले आणि चौकीत आणून कसून चौकशी केली.

तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. त्यानंतर त्याला कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा देत समज देण्यात आली. या धाडसी कारवाईमुळे गांधीपुरा परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलीस कोणतीही तडजोड करणार नसल्याचा स्पष्ट संदेश गेला असून, सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!