दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी व अनेक संघटनाच्या वतीने दौंंड तालुक्यात आंदोलन.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
दौंड – दिल्लीच्या जंतर-मंतर येथे NEET परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांबाबत विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते.त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीहल्ला केला.त्याच्या निषेधार्थ दौंंडमधे या हुकुमशाही व दडपशाहीचा निषेध करण्यासाठी दि. 23/07/2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा, दौंंड तालुका व इतर सहकाऱ्यांनी दौंंड तहसीलदार अरुण शेलार
उपविभागीय पोलीस अधिकारी
दौंंड पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
नेत्यांचे म्हणणे असे होते कि
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय संतापजनक आहे. दिल्ली पोलिसांनी केलेली मारहाण अतिशय निंदनीय आहे.”
तसेच सोनम वांगचुक यांचे गेली 20 दिवसांपासून चालू असलेले अमरण उपोषण याचा देखील उल्लेख करण्यात आला.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून दौंंड मध्ये भाजप सरकारच्या विरोधात निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
निवेदनात केलेल्या प्रमुख मागण्या:
1. NET पेपरफुटी प्रकरण: आले असून NET प्रकरणातील सर्व आरोपींची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी.
2. कठोर कारवाई: दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
3. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत: या काळात नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपये मदत द्यावी.
4. विद्यार्थ्यांचे हक्क: आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे.
5. गुन्हे मागे घ्यावे: आंदोलनाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
6. पोलीस कारवाई: जंतर-मंतर वरील आंदोलनात दिल्ली पोलिसांच्या लाठीहल्ल्यात एका विद्यार्थी मुलीचे निधन झाले आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.यासाठी अनेक अनुयायी उपस्थित होते.