अमळनेर आगाराची प्रवासी सेवेकडे दमदार वाटचाल! पाच अत्याधुनिक एसटी बसेस सेवेत; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित व आरामदायी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260723-WA0837

अमळनेर आगाराची प्रवासी सेवेकडे दमदार वाटचाल! पाच अत्याधुनिक एसटी बसेस सेवेत; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित व आरामदायी

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेरकरांसाठी आनंदाची बातमी ठरत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारात पाच अत्याधुनिक नवीन एसटी बसेस दाखल झाल्या असून त्यांचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विधिवत पूजन करून या बसेस प्रवासी सेवेत दाखल करण्यात आल्या. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बसेसमुळे अमळनेरकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अशोक लेलंड कंपनीच्या या नव्या बसेस ३ बाय २ आसन रचनेच्या असून प्रत्येक बसमध्ये ५२ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट, आतील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपक प्रणाली, बॅक कॅमेरा, एअर सस्पेन्शन तसेच पर्यावरणपूरक बीएस-६ मानांकनाचे आधुनिक इंजिन अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर आगारासाठी आणखी पाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यापूर्वीही त्यांच्या प्रयत्नांतून अमळनेर आगाराला पाच नवीन बसेस मिळाल्या होत्या. नव्याने दाखल झालेल्या बसेसमुळे आगारातील एकूण बससंख्या आता ७५ वर पोहोचली असून ग्रामीण व शहरी भागातील प्रवासी सेवेला अधिक बळ मिळणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता भविष्यात आणखी बसेस उपलब्ध झाल्यास अनेक मार्गांवरील फेऱ्याही वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या लोकार्पण सोहळ्यास कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक विक्रांत पाटील, पत्रकार किरण पाटील, एस. टी. मोरे, गौरव पाटील, आगार व्यवस्थापक राकेश हिरालाल शिवदे, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने, वरिष्ठ लिपिक तुषार पाटील, अकाउंटंट अमोल पाटील तसेच एसटी कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन बसेसच्या आगमनामुळे अमळनेर आगाराच्या सेवेत आणखी गुणवत्ता वाढणार असून प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!