दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा एन.मुक्टो.कडून निषेध !

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260724-WA0722

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा एन.मुक्टो.कडून निषेध !

 

अमळनेर : विक्की जाधव.

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) स्थानिक शाखेच्या वतीने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे करण्यात आला.

या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी पूर्णवेळ काळ्या फिती लावून आपल्या निषेधाची भावना व्यक्त केली. “विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली पोलिस कारवाई ही लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारी असून विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राहिला पाहिजे”, अशी भूमिका स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव यांनी व्यक्त केली. तर सरकारने विद्यार्थ्यांची भावना समजून न घेता, कुठलीही चर्चा न करता त्यांच्यावर हिंसात्मक कारवाई करणे ही निषेधार्ह बाब असल्याचे मत जिल्हा सचिव डॉ. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांना निषेधाचे निवेदन सादर केले.

याप्रसंगी एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भगवान भलेराव, सचिव डॉ. महादेव तोंडे, एन.मुक्टो.चे जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, प्रा. डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!