इंद्रापिंप्री ग्राम संरक्षक पथकाचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलिस निरीक्षक जयपाल हिरेंकडून सत्कार
अमळनेर: पो स्टे हद्दीत ग्राम संरक्षक पथक स्थापन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.१४-०३-२०२२ रोजी इंदापिंप्री गावात जानवे रोड काढून रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास गावात अनोळखी तीन इसम पल्सर गाडीवर संशयित रित्या जातांना दिसले त्यांची ग्राम संरक्षक पथकाच्या चारही तरूणांनी सखोल विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिलेत त्यावरून त्यांच्याशी बोलताना एकाने त्यांचे फोटो काढलेत व पोलीस गाडीस कॅाल केला. पोलीस येणार हे समजताच सदरचे तीन्ही संशयीत मोटार सायकल सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेले. सदरची गाडीची चौकशी केली असता बोदवड गावातून चोरी असून बोदवड पोलीस स्टेशनला गाडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज इंदापिंप्री गावात पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांनी स्वतः जाऊन चारही ग्राम संरक्षक सदस्यांचा सत्कार केला व शुभेच्छा देवून रात्री गस्त करतांना कशा प्रकारे संशयीतांची विचारपुस करावी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
