शिरपुरात धोबी समाजाच्या दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-30 at 6.31.13 PM

शिरपुरात धोबी समाजाच्या दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

w

शिरपुर : शिरपूर तालुका व शहर परीट (धोबी) सेवा मंडऴचा दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे यांचा वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश संघटक अरुण धोबी, किसान विद्या प्रसारक संस्था खजिनदार श्रीमती. आशाताई रंधे शिरपूर, सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. डाँ. सौ. रजनी लुंगसे, उद्योजक अशोक बेडीसकर शिरपूर, बोराडी उपसरपंच राहुल रंधे, धुऴे परिट (धोबी) सेवा मंडऴ जिल्हाध्यक्ष सागर सुर्यवंशी, नगरसेवक रोहित रंधे, शिरपुर परिट (धोबी) सेवा मंडऴ तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे हे होते. दि.30 जुन 2026 रोजी शिंपी भुवन, अंबिका नगर शिरपूर जि. धुऴे येथे हा कार्यक्रम झाला. प्रथम मान्यवरांचा हस्ते संत गाडगे बाबा यांचा प्रतिमा पुजन करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक ईश्वर बोरसे यांनी मान्यवरांचे स्वागत केल. मान्यवरांचा हस्ते विद्यार्थ्यांना ट्राफी व सन्मानपत्र देवुन गुणगौरव करण्यात आला. अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, किसान विद्या प्रसारक संस्था खजिनदार श्रीमती. आशाताई रंधे, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डाँ. सौ. रजनीताई लुंगसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश संघटक अरुण धोबी, बोराडी उपसरपंच राहुल रंधे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सुभाष लोहार यांनी केले तर आभार परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, परिट (धोबी) सेवा मंडळ मा. शहराध्यक्ष नरेश पवार, माजी युवक शहराध्यक्ष योगेश धोबी, युवक कार्यकर्ते मयुर येशी, प्रशांत (गोलु) सैंदाणे, विनोद येशी आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिरपुर शहर व तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!