पक्षप्रवेशाच्या अफवा पूर्णपणे खोट्या; आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ – नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-29 at 4.37.56 PM

पक्षप्रवेशाच्या अफवा पूर्णपणे खोट्या; आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ – नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा.

(निलेश गायकवाड)

इंदापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा व त्यांचे सहकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर आणि काही माध्यमांतून जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र, या सर्व अफवा पूर्णपणे खोट्या, निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा यांनी सर्व पक्षप्रवेशाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

” बोलताना भरत (शेठ) शहा म्हणाले, “मी आणि माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पक्ष नेतृत्वाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत. आम्हाला कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची गरज नाही आणि भविष्यातही असा कोणताही विचार नाही. पक्षप्रवेशाच्या बातम्या केवळ अफवा असून त्यामागे काही खोडसाळ प्रवृत्ती कार्यरत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण जाणूनबुजून खोट्या बातम्या पसरवत आहेत. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, अशा अफवांनी आम्ही विचलित होणार नाही. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ आहे.”

“आम्ही पक्षाच्या विचारांशी, धोरणांशी आणि पक्ष नेतृत्वाशी कायम निष्ठावान राहिलो आहोत. इंदापूर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच आम्ही सातत्याने काम करत आहोत. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.शेवटी त्यांनी इंदापूरकरांना आवाहन करत म्हटले की, “आमची निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आणि पक्ष नेतृत्वाशी कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही कायम राहील. अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही पक्षासोबत ठामपणे उभे आहोत आणि शहराच्या विकासासाठी कायम कार्यरत राहणार आहोत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!