सावनेर-कळमेश्वर विधानसभा युवासेना प्रमुखपदी राजा धार्मिक यांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-29 at 8.09.27 PM

सावनेर-कळमेश्वर विधानसभा युवासेना प्रमुखपदी राजा धार्मिक यांची नियुक्ती

रजत डेकाटे- प्रतिनिधी

कळमेश्वर:- शिवसेना (शिंदे गट) युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सावनेर-कळमेश्वर विधानसभा युवासेना प्रमुखपदी माजी युवासेना तालुकाप्रमुख राजा धार्मिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती युवासेनेचे पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले तसेच रामटेक लोकसभा युवासेना प्रमुख राज तांडेकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. कळमेश्वर तालुक्यात युवासेनेचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या राजा धार्मिक यांनी संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर बोलताना राजा धार्मिक यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राजा धार्मिक यांच्या विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याने सावनेर- कळमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजा धार्मिक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील युवासेनेच्या कार्याला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!