श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सौ. अर्चना वर्मा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260629-WA0622

श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सौ. अर्चना वर्मा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

अमळनेर : विक्की जाधव.

सामाजिक बांधिलकी जपत श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सदस्या सौ. अर्चना वर्मा यांनी सडावन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग व पेनचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

यावेळी सौ. अर्चना वर्मा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच हातभार लागेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप व सौ. अर्चना वर्मा यांचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!