राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विराट मोर्चा 30 जूनला मुंबईत धडकणार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260629-WA0541

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विराट मोर्चा 30 जूनला मुंबईत धडकणार 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शासनाने अनु. जाती उपवर्गीकरण करण्याचा थाट घातल्याने अनु.जाती वर्गावर मोठा अन्याय होऊ शकतो यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी 30 जून रोजी मुंबईत विराट मोर्चा निघणार असून त्यासाठी अमळनेर शहर व ग्रामीण चर्मकार समाज बांधवांची पूर्व नियोजीत बैठक शनिवारी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

शासनाने अनु.जाती उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला असून उपवर्गीकरण करताना समाज बांधवांना विचारात न घेता आणि उपवर्गीकरण करण्याचे नियोजन का केले जात आहे व कुणासाठी केले जात आहे आणि उपवर्गीकरणाची मागणी कुणीही केलेली नसताना शासन जबरदस्तीने उपवर्गीकरणाचा अन्यायकारक थाट अनु.जातीवर लादत आहे.त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील अनु.जाती 30 जून रोजी मोठा मोर्चा घेऊन मुंबईत धडकणार आहेत.त्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघ देखील सहभागी होणार असून मोर्चाच्या नियोजनाची पूर्व नियोजित बैठक म्हणून चर्मकार संघाची अमळनेर व ग्रामीण समाजबांधवांची बैठक पार पडली.बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग विसावे,नगरसेविका अंजली विसावेसह अमळनेर शहर व ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.होणाऱ्या मोर्चाला सर्व समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भानुदास विसावे व पांडुरंग विसावे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय बिऱ्हाडे यांनी केले.यावेळी समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!