BAPS स्वामीनारायण संस्कार धाम येथे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260629-WA0531

BAPS स्वामीनारायण संस्कार धाम येथे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील पानखिडकी परिसरातील BAPS स्वामीनारायण संस्कार धाम येथे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी, दि. २९ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता महापूजा तर सायंकाळी ७ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व BAPS हरी भक्तां कडून करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास कोठारी संत प.पू. आनंदजीवनदास स्वामीजी यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडणार असून पू. योगीस्नेहदास स्वामीजी व पू. अखंडमुनीदास स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ८ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविकांनी या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!