नांद येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-29 at 7.01.24 AM

नांद येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप!

मुख्याध्यापिका कविता चव्हाण आणि अध्यक्ष उमाकांत दांडेकर यांच्या कल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी :- रजत डेकाटे
मार्मिक समाचार वृत्तसेवा

भिवापूर तालुक्यातील नांद येथील शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने आघाडीवर असलेल्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं. नांद-२ येथे गुरुवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका कविता चव्हाण यांच्या कुशल नियोजनाखाली आणि आत्माराम गोरक्षक गोशाळा, नांदचे अध्यक्ष उमाकांत रामभाऊ दांडेकर सर यांच्या अमूल्य सहकार्याने व दातृत्वाने हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

ग्रामीण भागातील आणि विशेषतः गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून मुख्याध्यापिका कविता चव्हाण मॅडम यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उमाकांत दांडेकर सर यांनी तात्काळ पाठबळ दिले आणि त्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे आणि दांडेकर सर यांच्या दातृत्वामुळेच गावातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात मोठा दिलासा मिळाला असून, या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य श्रेय या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना जाते.

या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका कविता चव्हाण यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे नसून त्यांच्या हाती ज्ञानाची शिदोरी असावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उमाकांत दांडेकर सर यांच्यासारखे दाते पुढे आल्यामुळेच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देऊ शकलो. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमाला प्रामुख्याने नांद केंद्राचे केंद्रप्रमुख कुशल राजु रोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल चुटे, उपाध्यक्षा पूजा ताजने, सदस्य प्रिया क्षीरसागर, कविता चुटे, मनोज वाघमारे, अमोल हिंगणकर, माजी उपाध्यक्षा सुरेखाताई कन्नाके तसेच योग शिक्षक आचल दंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
हा संपूर्ण उपक्रम पत्रकार गोकुळ वैरागडे यांच्या विशेष सौजन्याने आणि सहकार्याने राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका कविता चव्हाण व शीला बहादुरे यांनी केले. या उपक्रमाबद्दल संपूर्ण परिसरातून मुख्याध्यापिका कविता चव्हाण आणि उमाकांत दांडेकर सर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!