खासदार संजय पाटील यांच्याकडून पत्रकारांचा अवमान झाल्याने अमळनेरात निषेध. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्रीना निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260628-WA0695

खासदार संजय पाटील यांच्याकडून पत्रकारांचा अवमान झाल्याने अमळनेरात निषेध. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्रीना निवेदन.

 

अमळनेर : विक्की जाधव.

खासदार संजय दीना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरून अवमानकारक तसेच मारहाणीची धमकी देणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

हे निवेदन मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस निरीक्षक, अमळनेर यांच्यामार्फत पाठवण्यात आले.तर प्रती उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हाधिकारी जळगाव यांनाही देण्यात आल्या आहेत.अमळनेर येथे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हे निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे की, “खासदार संजय पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरत अवमानकारक तसेच मारहाणीची धमकी देणारे वक्तव्य केले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे व लोकहिताचे प्रश्न उजेडात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. अशा पत्रकारांचा अवमान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर आघात करण्यासारखे आहे.””सदर वक्तव्यामुळे अमळनेर तालुक्यातील तसेच सर्व पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून पत्रकारितेच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. पत्रकारांविषयी अशी भाषा व वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित नसून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत,” असे संघाने नमूद केले आहे.तरी खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांची जाहीर व बिनशर्त माफी मागावी,पत्रकारांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक व धमकीजनक वक्तव्याची योग्य ती दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.तसेच भविष्यात पत्रकारांच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य किंवा वक्तव्य होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी अशी मागणी करत “पत्रकारांच्या स्वाभिमान व सन्मानाच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असून आवश्यकता भासल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवत आहोत असे यात म्हटले आहे.”

निवेदन देताना अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील,संजय पाटील, जितेंद्र ठाकूर,महेंद्र पाटील, बाबूलाल पाटील, हिरालाल पाटील, डॉ.विलास पाटील,संभाजी देवरे,संदीप सोनवणे, डॉ. युवराज पाटील, विजय पाटील, महेंद्र रामोशे, विक्की जाधव, कुंदन खैरनार, मुन्ना शेख,रविंद्र मोरे,काशिनाथ चौधरी यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!