आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक; AIMIM तर्फे पोलीस ठाण्यात निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260628-WA0686

आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक; AIMIM तर्फे पोलीस ठाण्यात निवेदन.

 

अमळनेर : विक्की जाधव.

सोशल मीडियावर इस्लाम धर्म, पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी अमळनेर शहरातील मुस्लिम समाज व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) यांनी एकत्र येत अमळनेर पोलीस स्टेशन गाठले. नाजिया ईलाही या महिलेकडून सोशल मीडियावरील एका मुलाखतीदरम्यान करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांचा निषेध नोंदवत संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी AIMIMचे शहराध्यक्ष सईद शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, मुस्लिम समाजातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!