अमळनेर नगराध्यक्षांच्या कारला भीषण अपघात; अपक्ष गटनेते महेश देशमुख जखमी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर बचावले

अपनी भाषा में पढ़े! Translate

cartoon-illustration-car-accident-two-cars-one-blue-one-orange-have-collided-head-middle-road-390926169

अमळनेर नगराध्यक्षांच्या कारला भीषण अपघात; अपक्ष गटनेते महेश देशमुख जखमी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर बचावले

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या वाहनाचा कन्नडकडे लग्नाला जात असताना अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात अपक्ष गटनेते महेश देशमुख यांच्या छातीला मार लागला असून त्यांना तातडीने सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अमळनेरमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली असून महेश देशमुख यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!