भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांचा केबल चोरी करणारे अटल गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडुन ६,३३,६५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-27 at 7.28.41 PM

भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांचा केबल चोरी करणारे अटल गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडुन ६,३३,६५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

(निलेश गायकवाड)

उजनी धरणाचे बॅक वॉटरचे पाण्यातील, पाण्याचा मोटारी व केबल चोरीस जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खुप मोठया प्रमाणामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी श्री. सोमनाथ शेंडगे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ वरीष्ठांना माहीती देवून मा. वरीष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनचे हदद्दीत मौजे डिकसळ गावचे हृददीत डिकसळ चौकीचे समोर भिगवण ते राशीन रोडवर नाकाबंदी नेमणुक वाहनांची चेकींग चालु केली होती.

दिनांक. २७/०६/२०२६ रोजी रात्री ०३:०० वा चे सुमारास मौजे डिकसळ गावचे हददीत डिकसळ पोलीस चौकीचे समोर राशिन भिगवण रोडवर पोलीस अंमलदार अजित सरडे यांना गोपनिय बातमीदार यांचे मार्फतीने माहीती मिळाली की, राशिन ते भिगवण रोडने राशिन बाजुकडुन भिगवण बाजुकडे एक पांढऱ्या रंगाची फोर व्हिलर गाडी येत असुन त्यामध्ये चोरीचा माल असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहीती मिळाल्याने पोलीस अंमलदार अजित सरडे यांनी तात्काळ प्रभारी अधिकारी श्री. सोमनाथ शेंडगे सो, सहा. पोलीस. निरीक्षक यांना माहीती दिली असता सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह नाकाबंदी करून संशईत चार चाकी गाडी ताब्यात घेवुन त्यामधील इसम नामे १) निलेश राजुकमार मोटे, वय २९ वर्ष, रा. सत्यम अपार्टमेंट प्लॉट नंबर. ८८ सेक्टर नंबर. १९ खारघर, रायगड, २) मनोज गुलाब बिंद, वय ३७ वर्ष, रा. बरेनी बारीपूर, ता. कळवा, जि.मिंशापुर, ३) डब्लु बाबुलाल बिंद, वय. ३१ वर्ष, रा. सदर, ४) विजयकुमार राशिंगार बिंद, वय. २५ वर्ष, सदर, ५) बिसाल शिवराज बिंद, वय. २० वर्ष, रा. सदर सध्या सर्व रा. गोपलपटट्टी शेवाळवाडी फाटा मांजरी पुणे यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता ते उडवाउडविची उत्तरे देवु लागली. त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या गाडीची पाहणी करता सदरची गाडी ही हुंदाई कंपनीची फोर व्हिलर एक्सेंट गाडी नंबर. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु. ०९८५ हीमध्ये कॉपरऱ्या काळया, निळया, लाल, कसेरी, पिवळे रंगाच्या वायर (केबल) ९८१ मीटर अंदाजे किंमत १.३३,६५०/- रू ची व हुंदाई कंपनीची फोर व्हिलर एक्सेंट गाडी नंबर. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु. ०९८५ किंमत रूपये ५,००,०००/- रू ची असा एकुण ६,३३,६५०/- रू किंमतीचा मुदद्देमाल मिळुन आला. यातील आरोपी यांचेविरूध्द भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा. रजि. नंबर. १६४/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम. १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!